Tue, Jul 23, 2019 07:09होमपेज › Ahamadnagar › पोलिस ठाण्याच्या शेजारीच मटका अड्डा!

पोलिस ठाण्याच्या शेजारीच मटका अड्डा!

Published On: Dec 02 2017 11:13AM | Last Updated: Dec 02 2017 11:13AM

बुकमार्क करा

नगर : वार्ताहर
शहरातील प्रमुख पोलिस स्टेशन असलेल्या कोतवाली पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्यात रोख 800 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. यासह शहरात तीन ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 21 हजाराचा मुद्देमाल व मटक्याचे साहित्य जप्त झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांना गुप्त बातमीदारांमार्फत शहरात तीन ठिकाणी मटका अड्डे सुरु असल्याची माहिती मिळाली. शिंदे यांनी पहिल्यांदा कोतवाली पोलिस ठाण्याच्या शेजारीच असलेल्या तात्या टोपे पुतळ्याच्या जवळ पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सुखदेव मुळे यांनी याची माहिती पोलिस उपनिरीक्षक कल्पना शिरदवाडे यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिस नाईक गायकवाड, बर्डे व बोरुडे यांनी पंचांना मटका अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी
अमित शिवाजी करे (वय 35, वांजरगल्ली, महादेव मंदिराजवळ), अनिल मधुकरराव फाटे (वय 23, बहिरवाडी एमआयडीसी, जि. बीड) हे दोघे आकडे लावतांना आढळून आले. तर विष्णू दगडू बुरगल (रा.
शिवाजीनगर, नगर) हा मटक्याचे आकडे लावत होता. फैरोज सुलेमानखान हा त्याच्या हस्तकाकरवी मुंबईमटका आकडा चालवीत असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुसर्‍या घटनेत अक्षय शिंदे यांनी कोतवाली पोलिसांना रात्री 11 वाजता बुरूडगाव रोडवरील अकोलकर हॉस्पिटलजवळ  त्र्याच्या आडोशाला मटका सुरु असल्याची माहिती देत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कोतवालीचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी कर्मचार्‍यांना कारवाईचे निर्देश दिले. कर्मचार्‍यांनी छापा टाकत अमित अविनाश कदम (वय 24, रा. भोसले आखाडा), सुरज दत्तात्रय गाढवे (वय 19, भोसले आखाडा) या आरोपींना ताब्यात  घेतले. त्यांच्याकडून रोख 1315 रुपये व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसर्‍या घटनेतही अक्षय शिंदे यांच्या सूचनेवरून शहर विभागाच्या पोलिसांनी नगर वाचनालयाच्या शेजारी असलेल्या मुंजोबा मंदिराच्या शेजारील खोलीवर छापा टाकला. यावेळी पाच जणांना मटका खेळतांना अटक करण्यात आली. त्यामध्ये ईश्‍वर कैलास कुलथे (वाघ गल्ली, नालेगाव), चेलाराम उद्धवदास कटारिया (टांगे गल्ली), विशंबर पांडुरंग बंडे (पटवर्धन चौक), रतन किसान साखला (दातरंगे मळा), शिरीष लक्ष्मण वाघमारे (पानसरे गल्ली) यांना ताब्यात घेण्यात आले. तर बुकी व घरमालक असलेला गिरीश पथक व महेश कचरे उर्फ कचरे सर हे दोघे फरार आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा
नोंदविण्यात आला आहे.