Wed, Sep 26, 2018 20:31होमपेज › Ahamadnagar › भीमा कोरेगावमधील युवकाच्या मृत्यूप्रकरणी तिघांना ताब्यात 

भीमा कोरेगावमधील युवकाच्या मृत्यूप्रकरणी तिघांना ताब्यात 

Published On: Jan 10 2018 11:04PM | Last Updated: Jan 10 2018 11:04PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

भीमा कोरेगावच्या दंगलीत ठार झालेल्या युवकाच्या मृत्यूप्रकरणी संशयित तिघांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथून ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित कैद झाले आहेत. अटक केलेल्यांमध्ये अक्षय दिलीप आल्हाट वय २०) चेतन भास्कर आल्हाट , तुषार उर्फ बबलू साहेबराव जवंजाळ (रा. तिघेही रा.पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी त्यांना सहकार्य केले.