Sat, Nov 17, 2018 20:37होमपेज › Ahamadnagar › नगरः बसस्थानकाबाहेर १५ वाहनांच्या काचा फोडल्या

नगरः बसस्थानकाबाहेर १५ वाहनांच्या काचा फोडल्या

Published On: Jan 02 2018 12:56PM | Last Updated: Jan 02 2018 12:56PM

बुकमार्क करा
नगरः प्रतिनिधी 

येथील माळीवाडा बसस्थानकाबाहेर सकाळी १० वाजल्यानंतर सुमारे १५ ते २० वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. भीमा कोरेगाव दंगलीचे पडसाद येथे पडल्याचे दिसून येत आहे. या दगडफेकीत एसटी बसचेही नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. 

भीमा-कोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त अभिवादनासाठी गेलेल्या भीमसैनिकांच्या वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडले होते. त्यानंतर झालेल्या धुमश्‍चक्रीत एकाचा मृत्यूही झाला होता. या घटनेचे राज्यात ठिकठिकाणी पडसाद उमटले आहेत.