Wed, Jul 24, 2019 05:54होमपेज › Ahamadnagar › अंब्रेलाफॉल गेटचे गिअर नादुरुस्त 

अंब्रेलाफॉल गेटचे गिअर नादुरुस्त 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

भंडारदरा : वार्ताहर

अंब्रेला फॉल गेटचे गिअर नादुरूस्त असल्याने भंडारदरा धरणाची शान असलेल्या अंब्रेला फॉलमधून रविवारी पाणी सोडण्यात न आल्याने हे विलोभनीय दृश्य बघण्यासाठी मोठ्या उत्साहाने आलेल्या अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला. त्यामुळे पर्यटकांवर निराश होत माघारी परतण्याची वेळ आली. याबाबत  पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

भंडारदरा येथे येणार्‍या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अंब्रेला फॉलचे मनमोहक दृश्य पाहता यावे व पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या व पर्यटकांच्या मागणीनुसार शनिवार व रविवार दुपारी 12 ते 3 या कालावधीत जलसंपदा विभागाकडून अंब्रेलाफॉल सोडण्यात येत आहे. मात्र या अंब्रेलाफॉल गेटच्या गिअरची नादुरुस्ती झाल्याने रविवार दि. 26 रोजी अंब्रेला फॉल गेट उघडणे शक्य झाले नाही. त्यामुळे हे विलोभनीय दृश्य बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. 

याबाबत भंडारदरा धरण शाखाधिकारी राजेंद्र कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, धरणाच्या अनेक झडपांची दयनीय अवस्था झाली असून नादुरुस्त झाले आहेत. सदर झडपा इटालियन परदेशी बनावटीच्या असून त्या कालबाह्य झालेल्या आहेत. त्यांच्या गिअरची नादुरुस्ती झाल्या कारणाने गेट ऑपरेट करणे शक्य नसल्याने रविवारी आम्ही दक्षतेच्यादृष्टीने खबरदारी म्हणून अंब्रेला फॉलमधून पाणी सोडले नाही. जर बळजबरीने गेट उघडले व बंद करणे शक्य न झाल्यास काय करणार? याबाबत यांत्रिकी विभागाकाकडून पाहणी झाली असून आधुनिक पद्धतीचे व्हॉल्व्ह बसविण्या संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. मात्र जलसंपदा विभागाने सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे असून यांत्रिकी विभागाकडून तातडीने दखल घेणे गरजेचे आहे, असे सांगितले.