Mon, May 20, 2019 22:05होमपेज › Ahamadnagar › अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्वास्थासाठी विशाल गणेशास साकडे

अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्वास्थासाठी विशाल गणेशास साकडे

Published On: Aug 16 2018 1:21PM | Last Updated: Aug 16 2018 1:21PMअहमदनगर : प्रतिनिधी

देशाचे माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती स्वास्थासाठी आज सकाळी शहर भाजपच्यावतीने ग्रामदैवत विशाल गणेशास साकडे घालण्यात आले. शहर जिल्‍हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी मंदिरात महाआरती केली. यावेळी आकार ब्रह्मवृदांनी शांती पाठ, अथर्वशीर्ष पाठ केला.

महाआरतीनंतर खासदार दिलीप गांधी यांचे विशाल गणेशास प्रार्थना करताना डोळे पाणावले होते. यावेळी बोलताना गांधी म्हणाले, ज्यांनी देशाला व देशातील जनतेला नवी दिशा देत विकासाची मुहूर्त मेढ केली असे भाजपाचे पितामाह अटलबिहारी वाजपेयी मृत्यूशी झुंज देत आहे. त्यांना ताबडतोब स्वास्थ लाभावे यासाठी आपल्या जागृत विशाल गणेशास साकडे घालून महाआरती केली आहे. अटलजींचे नगरसाठी वेगळे नात आहे. १९८५ साली त्यांची वाडियापार्क मैदानावर झालेली सभा न भूतो अशी भव्य झाली होती. त्यांच्याच नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली.

यावेळी विशाल गणपती मंदिराचे महंत संगमनाथ महाराज, सचिव अशोक कानडे, सरचिटणीस किशोर बोरा, गटनेते सुवेंद्र गांधी, तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी उपहापौर गीतांजली काळे, नरेंद्र कुलकर्णी, श्रीकांत साठे, जग्गनाथ निंबाळकर, मालन ढोणे, वसंत राठोड, धनंजय जामगावकर, प्रशांत मुथा, राहुल रासकर, मनेश साठे, गोपाल वर्मा, नरेश चव्हाण, जलिन्दर शिंदे, मिलिंद भालसिंग, डॉ. दर्षन करमाळकर, दीपक गांधी, रोषण गांधी, केदार लाहोटी, संग्राम म्हस्के, रोशन गांधी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.