Fri, Jul 19, 2019 18:05होमपेज › Ahamadnagar › मनपात आणखी एक आयएएस अधिकारी!

मनपात आणखी एक आयएएस अधिकारी!

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 11:40PMनगर : प्रतिनिधी

आयुक्‍त पदाचा कार्यभार जिल्हाधिकार्‍यांकडे असतांनाच आता आणखी एका आयएएस अधिकार्‍याची प्रशिक्षणासाठी व प्रशासकीय कामकाजासाठी महापालिकेत नियुक्‍ती करण्यात आली आहे. परिविक्षाधीन अधिकारी प्राजित प्रभाकरन नायर (आयएएस) यांच्या प्रभाग अधिकारी पदाची सूत्रे सोपविण्यात आली असून कालपासूनच (दि.10) ते माळीवाडा प्रभाग कार्यालयाच्या जप्ती मोहिमेत सक्रीय झाले आहेत.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नायर यांची प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्‍ती केली आहे. प्रशिक्षणासाठी तसेच प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी त्यांची नियुक्‍ती करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. नायर यांच्या रुपाने मनपाला दुसरा आयएएस दर्जाचा अधिकारी मिळाला आहे. दरम्यान, नायर यांनी कालपासूनच जप्ती मोहिमेत सक्रीय होवून दिवसभरात तीन मालमत्तांना टाळे ठोकले आहे.

मनपाच्या व्यापारी संकुलातील आनंद डोशी यांचा गाळा 1.13 लाखाच्या थकबाकीपोटी त्यांनी सील केला आहे. तर गुलाम गौस नवाव साहेब तांबटकर यांच्याकडील 5.27 लाखांच्या थकबाकीपोटी त्यांचे दोन गाळे जप्त करण्यात आले आहेत. 

नायर यांच्या उपस्थितीत प्रभाग अधिकारी अंबादास सोनवणे, कर निरीक्षक राजेंद्र शिरसाठ, बी. एम. कावरे, अजिम शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दुसरीकडे झेंडीगेट प्रभाग कार्यालयानेही नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टची दाणेडबरा येथील मालमत्ता 1.68 लाख व 9.21 लाखांच्या थकबाकीपोटी जप्त केली आहे. मालमत्तेतील शाळेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. कर निरीक्षक सुनील साठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.