पाथर्डी: शहर प्रतिनिधी
विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनास पाथर्डी तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना विविध कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड, प्रा. सुनिल पाखरे,अॅड. हरिहर गर्जे, डॉ. दीपक देशमुख, भास्कर दराडे, अॅड. शंकर डाळिंबकर,नबाब शेख, गोरक्ष ढाकणे, बापू लाड, बाळासाहेब कांबळे, कडूबाबा लोंढे,अॅड. आत्माराम वांढेकर,अॅड. वैभव आंधळे आदी उपस्थित होते.
देशभरात चार वर्षांपूर्वी लोकपाल कायदा मंजूर होवूनही लोकपाल नियुक्ती झाली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लोकपाल नियुक्तीसाठी अनेकदा फटकारले तरी देखील केंद्र सरकार लोकपाल नियुक्ती करत नाही.
मात्र, लोकपाल कायदा लागू होण्या अगोदरच लोकपाल कायदा कमजोर करण्यासाठी मंजूर कायद्यात दोन वेळा बदल केले. तसेच देशात भ्रष्टाचार संपुष्टात आल्याचा दावा सरकार करत आहे.परंतु, भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी देशात लोकपाल सारखी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात नसल्याने भ्रष्टाचार संपुष्टात येणे अशक्य आहे.
सन 2014 च्या निवडणूक प्रचारादरम्यान मोदी सरकारने सक्षम लोकपालाची नियुक्ती केली जाईल असे जनतेला सांगितले केले. परंतु चार वर्षे उलटूनही अद्याप लोकपाल नियुक्त केला नाही. उलट लोकपाल बिलामध्ये अनावश्यक सुधारणा करून भ्रष्टाचाचार्यांना अभय देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.
चुकीच्या पद्धतीने एफसीआरए कायद्यामधे बदल करून राजकीय पक्षांना मोठमोठ्या कंपन्याकडून आपली ओळख लपवून बेहिशोबी देणग्या मिळवण्याचा मार्ग खुला केला आहे. यासाठी लोकपाल कायदा लागू झाला पाहिजे, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
Tag : anna hajare, support, in pathardi tahasil, office,
May 06 2018 1:06AM
May 06 2018 1:06AM
May 06 2018 1:06AM
May 06 2018 1:06AM
May 06 2018 1:06AM
May 06 2018 1:06AM