Tue, Feb 19, 2019 12:07होमपेज › Ahamadnagar › नगराध्यपदी बंडखोर गटाच्या नगरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे

नगराध्यपदी बंडखोर गटाच्या नगरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे

Published On: May 23 2018 2:56PM | Last Updated: May 23 2018 2:56PMअहमदनगर : प्रतिनिधी

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोर गटाने शिवसेना आमदार विजय औटी यांना धक्का देत नगरपंचायतीवर  एक हाती सत्ता मिळवली. नगराध्यक्षपदी बंडखोर गटाच्या वर्षा नगरे तर, उपनगराध्यक्षपदी चंद्रकांत खेडे हे विजयी झाले आहेत.

बंडखोरगटाच्या उमेदवारांना ९ मते मिळाली तर, शिवसेनेच्या वैशाली औटी यांना ७ मते मिळाली. एक नगरसेवक अनुपस्थित होते. 

या निवडणुकीमुळे शिवसेना आमदार औटी यांना चांगलाच धक्का बसला आहे.  शिवसेनेचे पाच नगरसेवक विरोधी गटाला मिळाल्याने औटी गटाला पराभवाचा सामना करावा लागला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरे यांना ९ व शिवसेनेच्या वैशाली औटी यांना ७ मते मिळाली. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चंद्रकांत चेडे यांना ९ मते मिळाली.