Fri, Jul 10, 2020 20:41होमपेज › Ahamadnagar › नितीन आगे खून प्रकरण; गरज पडल्यास फेरसुनावणी घ्यावी

नितीन आगे खून प्रकरण; गरज पडल्यास फेरसुनावणी घ्यावी

Published On: Dec 22 2017 9:09PM | Last Updated: Dec 22 2017 9:09PM

बुकमार्क करा

औरंगाबाद/नगर : प्रतिनिधी

अहमदनगर येथील नितीन आगे खून प्रकरणाचा नगरच्या सत्र न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करावा, आरोपींना शिक्षा द्यावी किंवा या खटल्याची पुन्हा नव्याने सत्र न्यायालयात सुनावणी घ्यावी, अशी विनंती सरकारी पक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली आहे. नगरच्या न्यायालयाने दिलेल्या निकालविरुद्ध काल (दि. २२) अपील दाखल करण्यात आले आहे.  

मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे हे या प्रकरणात काम पाहत आहेत. राज्यात गाजलेल्या नगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरणात नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने २३ नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. या निकालाविरोधात सरकार पक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले आहे. नितीन आगेच्या शवविच्छेदन अहवालात नितीनचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झालेले आहे. याप्रकरणी डॉ. युवराज कराडे आणि डॉ. संजीव मुंडे यांची साक्ष महत्वाची आहे. शवविच्छेदन अहवालात मृताच्या अंगावर मारहाणीच्या आठ गंभीर जखमा आढळलेल्या आहेत. या जखमा लाकडी काठी आणि हॅमरने (टणक वस्तू) मारहाण केल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. नितीनची आई रेखा, बहीण रुपाली सोनुने आणि दुर्गा आगे यांची साक्ष महत्वाची आहे. नितीनला शाळेत मारहाण करण्यात आली असून, कान्होबा मंदिराजवळ तो पडल्याची माहिती आरोपींनी नितीनच्या आईला दिली होती. तसेच ‘नितीनचे कामच केले  आहे’, असे आरोपीने त्याच्या बहिणींना सांगितले होते. हे मुद्दे युक्तिवादासाठी महत्वाचे ठरणार आहेत.