Mon, Jun 01, 2020 04:56होमपेज › Ahamadnagar › महापौर व शिवसेना महिला आघाडीचे एसपींना निवेदन

'चिमुरडीवर अत्याचार : विशेष सरकारी वकील नियुक्त करा'

Published On: Dec 05 2017 5:47PM | Last Updated: Dec 05 2017 5:47PM

बुकमार्क करा

अहमदनगर : प्रतिनिधी

रेल्वे स्टेशन परिसरातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात यावा अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी याबाबत तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी महापौर सुरेखा कदम, आशा निंबाळकर, सुषमा पडोळे, सुरेखा भोसले आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. 'दै. पुढारी'ने 'त्या' चिमुरडीला न्यायाची प्रतीक्षा' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केल्यानंतर हे निवेदन देण्यात आले.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'अतिशय संवेदनशील प्रकरणाचा खटला अतिशय धीम्‍यागतीने सुरू आहे. खटला सुरू होऊन ९ महिने झाले. परंतु, फक्त एकच साक्षीदार तपासण्यात आला. त्यामुळे या खटल्यात तातडीने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली.