Mon, Jun 17, 2019 14:14होमपेज › Ahamadnagar › शहर पाणी योजनेची वीज तोडली 

शहर पाणी योजनेची वीज तोडली 

Published On: Feb 27 2018 3:26PM | Last Updated: Feb 27 2018 3:26PMअहमदनगर : प्रतिनिधी

महापालिका शहर पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा बिलाच्या  थकबाकीमुळे महावितरणने आज पुन्हा एकदा तोडला आहे. चार दिवसांपूर्वीच मनपाने १ कोटी रूपये भरले आहेत. तर १ कोटींचे पुढील तारखेचे धनादेश दिलेले आहेत. मात्र, १५७ कोटींच्या थकबाकीपैकी चालू वर्षाचे १३ कोटी शिल्लक आहेत. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली असून, चालू वर्षाची थकबाकी मनपाला तात्काळ भरावीच लागेल, असे  महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.