Tue, Jul 16, 2019 09:47



होमपेज › Ahamadnagar › वैद्यकीय उपचारासाठी तो जातो जेलमध्ये...

वैद्यकीय उपचारासाठी तो जातो जेलमध्ये...

Published On: Dec 04 2017 1:26PM | Last Updated: Dec 04 2017 1:26PM

बुकमार्क करा





अहमदनगर : प्रतिनिधी

कोपर्डी प्रकरणातील आरोपींबाबत मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक व पोलिस महासंचालकांच्या नावाने निवावी फोन करून सबजेलच्या अधिकाऱ्यांना फोन करणाऱ्याला अटक केली आहे. अमित जगन्नाथ कांबळे (रा. नवीपेठ, निंबाळकरवाडा, पुणे) असे अटक केलेल्‍या संशयीत आरोपीचे नाव आहे. 

अमितला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. वैद्यकीय उपचारासाठी पैसे नसल्याने तो तोतयागिरी करून जेलमध्ये जाण्यासाठी असे गुन्हे करीत होता. २०१० पासून तो असे उद्योग करत आहे. पुण्याचे तत्कालिन पोलिस आयुक्त सत्यपालसिंग यांना त्याने पहिल्यांदा फोन करून दमदाटी केली होती. पोलिसांनी अटक केल्यांनतर जामीन नाकारून तो उपचारासाठी जेलमध्ये राहणेच पसंत करतो.

न्यायालयाने जामिनावर बाहेर सोडल्यानंतर तो पुन्हा दुसरा गुन्हा करतो, असे अनेक गुन्हे त्याने केलेले आहेत. पुढील चौकशासाठी कांबळे याला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.