अहमदनगर : प्रतिनिधी
मागील काही दिवसांत घडलेल्या घटना दुर्दैवीच आहेत. महिनाभरातील या घटनांमुळे जिल्ह्याचे नाव राज्यभरात बदनाम झाले आहे. त्यामुळे अशा घटना परत घडू नयेत यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. त्यानंतरही घटना घडल्यास संबंधित क्षेत्रातील पोलिस निरीक्षकावर सर्वप्रथम कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिला.
महराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तलाठी, स्वातंत्र्य सैनिक, पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच जिल्हा लघु उद्योजक पुरस्कार वितरण आणि कृषी विभागाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
Tags : ahmednagar, guardian minister, ram shinde