होमपेज › Ahamadnagar › गोवा एक्‍सप्रेसचे इंजिन रूळावरून उतरले, मोठी दुघर्टना टळली 

गोवा एक्‍सप्रेसचे इंजिन रूळावरून उतरले, दुघर्टना टळली 

Published On: Jan 12 2018 8:00AM | Last Updated: Jan 12 2018 8:03AM

बुकमार्क करा




अहमदनगर : पुढारी ऑनलाईन

निजामुद्दीन-गोवा एक्‍सप्रेसचे इंजिन रेल्‍वे रूळावरून खाली उतरले. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. अपघात झालेली रेल्‍वे अहमदनगरहून मनमाडकडे जात असताना अमदनगर रेल्‍वे स्‍टेशनपासून ३० किमी अंतरावर  घारगाव येथे एका छोट्या पुलाचे काम नुकतेच पूर्ण  झाले होते. त्‍यानंतर रेल्‍वेला या पुलावरून जाण्याची परवानगी दिली होती. याच पुलावरून निजामुद्दीन-गोवा एक्‍सप्रेस जात असताना अचानक रुळाचा एक भाग तुटला. त्‍यामुळे रेल्‍वे रुळावरून  खाली उतरली. 

रेल्‍वे रुळावरून खाली उतरत असताना चालकाने सतर्कता दाखवत ब्रेक लावला. त्‍यामुळे मोठी दुर्घना टळली. रेल्‍वेचे इंजिन रूळावरून जवळ जवळ एक मीटर खाली उतरले होते. घटनेची माहिती मिळताच रेल्‍वे प्रशासन घटनास्‍थळी दाखल झाले. या घटनेनंतर निजामुद्दीन-गोवा एक्‍सप्रेसचे इंजिन सोडून इतर सर्व डबे घारगावच्या मागील स्‍टेशनवर सुखरुप पोहचविण्यात आले. 

या घटनेमुळे रेल्‍वेतील प्रवाशांना मात्र, नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. तब्‍बल आठ तास विसापूर स्‍टेशनवर सर्व प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. घटनेनंतर या मार्गावरील तीन रेल्‍वे गाड्या रद्द करण्यात आल्‍या आहेत.