Tue, May 21, 2019 22:09होमपेज › Ahamadnagar › गोळ्या झाडून 2 शिवसैनिकांची हत्या

गोळ्या झाडून 2 शिवसैनिकांची हत्या

Published On: Apr 07 2018 7:30PM | Last Updated: Apr 07 2018 7:38PMअहमदनगर : प्रतिनिधी

निवडणुकीच्या वादातून केडगाव येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व त्यांचा सहकारी वसंत ठुबे यांची शनिवारी सायंकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक केली. नगर-पुणे रस्ता बंद करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत मृतदेह घटनास्थळीच होते. सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. या घटनेमुळे केडगाव परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, आरोपी संदीप गुंजाळ हा पिस्सतुलासह पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.

केडगाव येथे शनिवारी पोटनिवडणुकीचा निकाल असल्यामुळे मोठे राजकीय वातावरण तापले होते. शुक्रवारी दुपारी देखील मोठ्या राजकीय पुढार्‍यांमध्ये बाचाबाची झाली होती. पोलीस प्रशासनाने मध्यस्ती केल्याने या वादावर पडदा पडला. मात्र शनिवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली होती. तेव्हापासून केडगावात राजकीय वातावरण तापलेले होते. या दरम्यान अनेक गटातटात तु-तू, मै-मै सुरू होती. दुपारी निकाल जाहिर झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये धुकचक्री झाली होती. मात्र ते वाद देखील मिटले होते. मात्र सायंकाळी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व त्यांचा सहकारी वसंत ठुबे ही दोघे सुवर्णनगर परिसरात बसले होते.

 दरम्यान दोन तरुणांनी समोर येऊन त्यांच्यावर तलवारीने वार केले. तसेच पिस्तुलमधुन गोळ्या झाडल्या व ते पसार झाले. यात संजय कोतकर व वसंत ठुबे हे जागीच ठार झाले.हा प्रकार शिवसैनिकांना समजला असता हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलीस वाहनावर तुफान दगडफेक केली. तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर तसेच दुकानांवर दगडफेक केली. निवडणुक निकाल संपल्यानंतर केडगावात पोलीस बंदोबस्त निवाळला होता. त्यामुळे तुरळक पोलिसांना हा जमाव अटोक्यात आणता आला नाही. त्यामुळे सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, पोलीस निरीक्षक अभय परमार, पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, शिवाजी नागवे यांच्यासह राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत जमावाला शांत करण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच होते.
 

हा पोलिसांचा हालगर्जीपणा....

केडगाव हे राजकीय व गुन्हेगारी दृष्ट्या संवेदनशील आहे. हे पोलिसांना माहित होतेे. निवडणुक निकाल संपल्यानंतर जवळपास सर्व बंदोबस्त घरी पाठविण्यात आला होता. पोलिसांना केडगावच्या निवडणुकीत अनपेक्षीत काहीही होऊ शकते हे माहित असताना त्यांनी हालर्जीपणा केला. त्यामुळेच दोघांना जीव गमवावा लागला. असा आरोप नागरिकांनी केला आहे.

लोकप्रतिनीधींना अटक करा...

नुकत्याच झालेल्या निवडणुकीने या दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे जमावातील काही व्यक्तींनी काही लोकप्रतिनिधींची नावे घेतली आहे. त्यांनी अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. या भूमिकेमुळे मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलीस मध्यस्तीची भूमिका घेत असून त्यांना देखील दमदाटी होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.