Thu, Jun 27, 2019 16:37होमपेज › Ahamadnagar › नगर खून प्रकरण : आमदार जगतापांसह चौघांना अटक

शिवसैनिकांची हत्या: आमदार जगताप यांना अटक

Published On: Apr 08 2018 8:36AM | Last Updated: Apr 08 2018 6:04PMनगर : पुढारी ऑनलाईन

नगर-शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन आमदारांसह एकूण ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मृत संजय कोतकर यांचा मुलगा  संग्राम कोतकर (वय २५) याने ही फिर्याद दाखल केली आहे.

वाचा : गोळ्या झाडून 2 शिवसैनिकांची हत्या 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, माजी महापौर संदीप कोतकर, भानुदास कोतकर यांच्या सांगण्यावरुन  विशाल कोतकर, औदूंबर कोतकर, बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ, रवी खोलम, अशोक कराळे, नवनाथ कराळे, मोहसीन शेख, विजय कराळे, रमेश कोतकर, शरद जाधव, संदीप गिर्हे, दादा येणारे, विनोद लगड, मनोज कराळे, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पवार, संकेत लगड, बाबासाहेब कोतकर, राजू गंगड, अप्पा दिघे, बाबूराव कराळे यांच्यासह पाच ते सहा जणांनी कट, कारस्थान करून संजय कोतकर व वसंत ठुबे यांना गोळ्या घालून व कोयता तलवारीने मारल्याचे या फिर्यादित  म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी ३० जनांसह इतर ५ ते ६ जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील आ. जगताप, बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळसह आणखी एकास अटक केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचे अपर पोलिस महासंचालक नगरला निघाले आहेत. विशेष महानिरीक्षक नगरलाच ठाण मांडून आहेत.

पोलिस अधीक्षक कार्यालयातून आमदार पळविले, तोडफोड

पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप या पिता-पुत्रांना जमावाने पोलिस अधीक्षक कार्यालयातून उचलून नेले. तसेच कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या तोडफोड प्रकरणी अॅड. प्रसन्न जोशी, कैलास गिरवलेसह २२ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर तणाव निर्माण झाल्याने मध्यरात्री आमदार संग्राम जगताप हे पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वत:हून हजर झाले.

Tags : ahmednagar, ahmednagar news, kedgaon murder case, shivsena, MLA