Fri, Apr 26, 2019 15:17होमपेज › Ahamadnagar › सीना पात्रातील पक्क्या बांधकामांवर हातोडा!

सीना पात्रातील पक्क्या बांधकामांवर हातोडा!

Published On: Jun 14 2018 1:01PM | Last Updated: Jun 14 2018 1:01PMअहमदनगर : प्रतिनिधी 

नगर महानगरपालिकेने सिना नदी पात्रातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. नवीन टिळक रोड वरील अतिक्रमण काढण्यात येत आहे. या कारवाई अंतर्गत शेजारी असलेली पक्की बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली आहे.  अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या पथकाने आज सकाळपासून कारवाईला सुरुवात केली आहे. 

गेल्या बारा दिवसांपासून शहरात सिना नदीपात्रातील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरु आहे. आज येथील एका मार्बलच्या दुकानाचे वाढत गेलेले अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.