Sun, May 26, 2019 01:23होमपेज › Ahamadnagar › आठवले मुंबईतून लढणार निवडणूक

आठवले मुंबईतून लढणार निवडणूक

Published On: Sep 12 2018 1:46AM | Last Updated: Sep 12 2018 12:37AMनगर : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढविण्याचा निर्णय रद्द केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. रिपाइंच्या जिल्हा मेळाव्याबाबत शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर केंद्र शासन आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

आठवले म्हणाले की, यापूर्वी आपण एकदा मुंबईच्या दक्षिण-मध्य मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे. त्यामुळे याच भागातून आगामी लोकसभा लढविणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची युती झाली नाही, तरी आपण भाजप बरोबर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सामाजिक वातावरण दूषित करणार्‍या संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अ‍ॅट्रॉॅसिटी कायद्यातील सुधारणेला धक्का लागणार नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. ‘दलित’ शब्दाच्या वापरास परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करू, असे ते म्हणाले.