होमपेज › Ahamadnagar › आरोपी सावळेसमोर बजेट रजिस्टर तपासले

आरोपी सावळेसमोर बजेट रजिस्टर तपासले

Published On: Mar 25 2018 1:44AM | Last Updated: Mar 24 2018 11:29PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळ्यात पोलिस कोठडीत असलेला आरोपी बाळासाहेब सावळे याच्यासमोर तोफखाना पोलिसांनी लेखापरीक्षक चंद्रकांत खरात, शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या उपस्थितीत बजेट रजिस्टरमधील तपासले. या रजिस्टरवर कामांच्या कुठल्याही नोंदी आढळून आलेल्या नाहीत. त्याचा रितसर पंचनामा करण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले.

सावळे हा पोलिस कोठडीत असून, त्याला सोमवारपर्यंत (दि. 26) कोठडी आहे. त्याच्यासमोरच शहर अभियंता व लेखापरीक्षकांसमोर बजेस्ट रजिस्टरच्या नोंदीबाबत चौकशी करण्यात आली. नोंदी नसतानाच बिले अदा केलेली आहेत. यापूर्वीही बजेट रजिस्टर एकदा तपासण्यात आलेले होते. आता शनिवारी (दि. 24) पुन्हा आरोपीसमोर बजेट रजिस्टरची नोंदी पोलिसांनी जाणून घेतलेल्या आहेत. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रोहिदास सातपुते हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे. ‘केडीएम’शी संबंधित कर्मचार्‍यांची नावेही पोलिसांनी मागविलेली आहेत. 

Tags : ahmadnagar, street light scam, ahmadnagar news,