Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Ahamadnagar › बनावट दारुकांड, आरोपी दुग्गल याचा कोठडीत मृत्यू 

बनावट दारुकांड, आरोपी दुग्गल याचा कोठडीत मृत्यू 

Published On: Mar 24 2018 11:47PM | Last Updated: Mar 24 2018 11:52PMअहमदनगर : प्रतिनिधी 

नगर- पांगरमल विषारी दारूकांडातील आरोपी मोहन दुग्गल याचे शनिवारी नाशिक रुग्णालयातील कोठडीत उपचार घेत असताना मृत्यू झाला. तो सुमारे वर्षभरापासून नाशिक रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

मोहन दुग्गल याची कारागृहात असताना प्रकृती खालाविल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दुग्गल मयत झाला. त्याविरूद्ध विषारी दारूकांडाचे एमआयडीसी, नेवासा, नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच 'मोक्का' अन्वयेही कारवाई करण्यात आलेली आहे.

 

Tags : ahmadnagar, ahmadnagar news, duplicate liquor issue,accused mohan duggal, died in police custody