Fri, Apr 26, 2019 17:20होमपेज › Ahamadnagar › महापालिकेचा 619 कोटींचा अर्थसंकल्प

महापालिकेचा 619 कोटींचा अर्थसंकल्प

Published On: Mar 20 2018 2:25AM | Last Updated: Mar 20 2018 2:25AMनगर : प्रतिनिधी

महापालिकेचा 2018-2019चा रखडलेला 619 कोटींचा अर्थसंकल्प अखेर सोमवारी आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी स्थायी समितीत सादर केला. 315.46 कोटींच्या उत्पन्नाच्या आधारावर 226.55 कोटींचा महसुली खर्च प्रशासनाकडून प्रस्तावित करण्यात आला आहे. महसुली व भांडवली जमा-खर्च असा एकूण 3.10 कोटींच्या शिलकेसह 619 कोटींचा अर्थसंकल्प मनपाने सादर केला आहे. दरम्यान, चालू वर्षाच्या 585 कोटींच्या अंदाजपत्रकाला 80 कोटींची कात्री लावत सुधारित अंदाजपत्रकही सादर करण्यात आले .

आर्थिक अडचणीत असलेल्या प्रशासनाने नगरसेवक निधीसाठी 6.31 कोटींची तरतूद वगळता नवीन योजना, विकासकामांसाठी रुपयाचीही तरतूद केलेली नाही. महसुली उत्पन्नात संकलित कर 55 कोटी, शास्ती 48 कोटी, जीएसटी अनुदान 85 कोटी व इतर महसुली अनुदान 10 कोटी, गाळा भाडे  2 कोटी, पाणीपट्टी, पाणी विक्री, मीटरद्वारे पाणीपुरवठा 71.97 कोटी व इतर 5.61 अशी 315.46 कोटींच्या उत्पन्नाची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. 

महसुली खर्चात वेतन भत्ते, मानधनासाठी 105 कोटी, पेन्शन 28 कोटी, पाणीपुरवठा वीज बिल 30 कोटी, पथदिवे वीज बिल 6.50 कोटी, शिक्षणमंडळ वर्गणी 3.50 कोटी, सहावा वेतन आयोग फरक 4.20 कोटी, महिला बालकल्याण विभाग 2.64 कोटी, अपंग पुनर्वसन योजना 1.58 कोटी, मागासवर्गीय कल्याणकारी योजना 7.96 कोटी, सभासद मानधन 91 लाख, निवडणूक खर्च 2.10 कोटी, औषधे 1.30 कोटी, कचरा संकलन व वाहतूक 6.75 कोटी, पाणीपुरवठा दुरुस्ती 40 लाख, टँकरद्वारे पाणी, पावडर खरेदी 1.25 कोटी, अशुध्द पाणीआकार 1.25 कोटी, केडगाव पाणी योजना हिस्सा 1.75 कोटी, शहर पाणी योजना मनपा हिस्सा 4 कोटी, नाट्यसंकुल मनपा हिस्सा 1.75 कोटी, पिंपळगाव माळवी तलाव 10 लाख, अमृत योजनेतील भुयारी गटार, उद्यान, सोलर विविध कामांसाठी मनपा हिश्श्याची तरतूद प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

भांडवली अंदाजपत्रकात शासनाकडून कामांसाठी मिळणारे अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरुन 353.10 कोटींचा खर्च होणार असल्याचे आयुक्‍तांनी यावेळी स्पष्ट केले. शहराच्या विकासासाठी शासनाच्या योजनांमधून कामे मार्गी लावून शहराच्या सर्व भागात विकासाला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्‍त मंगळे यांनी सांगितले. दरम्यान, चालू वर्षाच्या (2017-2018) 585 कोटींच्या मंजूर अंदाजपत्रकात अपेक्षित असलेले उत्पन्न न मिळाल्यामुळे तब्बल 80 कोटींची कात्री लावण्यात आली आहे. दरम्यान, सभापती सुवर्णा जाधव यांनी अभ्यासासाठी सभा तहकूब केली. आजपासून (दि.20) अंदाजपत्रकावर समितीत चर्चा होणार आहे.