Mon, Jul 22, 2019 00:43होमपेज › Ahamadnagar › बायोमेट्रिक धान्य वितरणात जिल्हा दुसरा

बायोमेट्रिक धान्य वितरणात जिल्हा दुसरा

Published On: Feb 13 2018 2:05AM | Last Updated: Feb 13 2018 12:32AMनगर : प्रतिनिधी

राज्यभरात बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्यवितरणाचे काम सुरु आहे.  या प्रणालीत नगर जिल्हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. पहिला क्रमांक नाशिक जिल्ह्याने मिळविला असल्याचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी जितेंद्र इंगळे यांनी सांगितले. 

रेशन दुकानांतील वाढत्या काळाबाजाराला लगाम घालण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्यवितरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नगर जिल्ह्यात 1 हजार 862 पॉस मशिन उपलब्ध केले गेले. जानेवारी महिन्यात बायोमेट्रिकद्वारे धान्यवितरण करण्यात नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.  नाशिकने 70 हजार टन धान्याचे वितरण केले. त्याखालोखाल नगर जिल्ह्याने 11 हजार 700 टन धान्य वितरित केले. 

याचा लाभ जिल्ह्यातील 70 टक्के  लाभार्थींना झाला आहे. जिल्ह्यात रेशनकार्डला आधार कार्ड जोडून ऑनलाइन नोंदणी करण्याचे काम 95 टक्के झाले आहे. या नोंदणीत (ईपीडीएस कामात) नगर जिल्हा नाशिक विभागात प्रथम आला आहे.