Mon, Mar 25, 2019 17:51होमपेज › Ahamadnagar › आवर्तन सुटल्याने शेतकर्‍यांना दिलासा

आवर्तन सुटल्याने शेतकर्‍यांना दिलासा

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 28 2018 11:28PMकर्जत : प्रतिनिधी

कुकडी धरण लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाणी खरीप पिकांसाठी सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचे पाणी काल (दि.28) कर्जत तालुक्यात पोहचले असून, आवर्तन टेल टू हेड असल्याने प्रथम करमाळा तालुक्यास पाणी देण्यात येणार आहे. पावसाने ओढ दिलेली असताना हे आवर्तन सुटल्याने शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या आर्वतनासाठी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या प्रयत्नामुळे हे आवर्तन सूटले आहे.

कर्जत तालुक्यात खरीप पिकांची काही प्रमाणात पेरणी झाली आहे. सुरवातीला पडलेल्या पावसावर तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरीप बाजरी, मूग, तूर, मका यासह विविध पिकांची पेरणी केली आहे. याशिवाय तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे असून, फळबागाही आहेत. या सर्व पिकांना आणि फळबागांना पाण्याची गरज आहे.  

पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात 

या वर्षी कर्जत तालुक्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. अवकाळी पाऊस एक दोन झाले. मॉन्सूनही वेळवर आला. मात्र जून महिन्या सुरवातीला एक पाऊस झाला. त्यानंतर मात्र पाऊस गायब झाला आहे. या पावसावर काही शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. आकाशात काळे ढग जमा होतात आणि जोरदार पाऊस पडेल, असे वाटते आणि लगेच जोरावा वारा सुटतो. आकाशातील सर्व ढग गायब होतात. निसर्गच्या लहरी पणामुळे शेतकरी मात्र संकटात सापडला आहे. 

कर्जत तालुक्यात आज पाहिले, तर पावसाअभावी सर्व पिके जळू लागली आहे. विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. काही गावांनी तर टँकर मागणीचे प्रस्ताव पण तयार केले आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आणि चार्‍याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने याबाबत तातडीने मदत देण्याची गरज आहे.

कुकडीच्या पाण्यामुळे दिलासा 

शेती आणि शेतकरी संकटात असताना कुकडीचे आवर्तन सुटले आहे. हे आवर्तन टेल टू हेड आहे. या वर्षीचे खरीप हंगामाचे हे पहिले आवर्तन असून, 90 क्रमांकाचा अर्ज भरून शेतकर्‍यांना हे पाणी देण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडीचे अधिकार्‍यांनी दिली. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. हे आवर्तन सुटल्याने कुकडी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दिलास मिळणार आहे. तालुक्यातील सीना, दूरगाव, थेरवडी सहसर्व पाझर तलाव या पाण्याने भरून मिळावेत, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.