Mon, Nov 19, 2018 16:48होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : आढळगाव येथे जमिनीला पडले अचानक भगदाड 

अहमदनगर : आढळगाव येथे जमिनीला पडले अचानक भगदाड 

Published On: May 04 2018 6:57PM | Last Updated: May 04 2018 6:56PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

आढळगाव येथील संत रोहिदास मंदिरासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत आज (दि. ४) दुपारच्या सुमारास आठ फुट उंचीचे आणि तीन फुट रुंदीचे भगदाड पडले. हे भगदाड नेमके कशामुळे पडले याविषयी उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. 

संत रोहिदास मंदिरासमोर मोकळी जागा आहे. या परिसरात कॉन्क्रीटीकरण रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या बाजुलाच आज दुपारच्या सुमारास अचानक भगदाड पडले. सुरुवातीला हे भगदाड कमी उंचीचे होते. एका बाजूने पाण्याचा प्रवाह सुरु झाल्याने बाजुची माती खाली कोसळली. गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. काही उत्साही तरुणानी याची माहिती सोशल मिडियावर टाकली . नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. 

घटनास्थळी गटविकास अधिकारी अलका शिरसाठ , शाखा अभियंता डी. ड़ी .कांगुने, ग्रामविस्तार अधिकारी वाहुरवाघ यानी पाहणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यानी प्रांताधिकारी गोविंद दानेज यांच्याशी संपर्क साधत घटना स्थळाची पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्याची मागणी केली.
नेमका काय प्रकार 

अचानक जमिनीला भगदाड पडल्याने अनेक तर्क- वितर्क लढविले जात आहेत. काही लोकांच्या मते या ठिकाणी जूना आड असावा मात्र या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या मते या ठिकाणी आड नव्हता. त्यामुळे हे भगदाड नेमके कशामुळे पडले याचा शोध घेण्याची गरज आहे.