Sun, Jul 21, 2019 12:35होमपेज › Ahamadnagar › सीना पात्रातील नंदनवन लॉनच्या अतिक्रमणावर हातोडा!

सीना पात्रातील नंदनवन लॉनच्या अतिक्रमणावर हातोडा!

Published On: Jun 07 2018 3:43PM | Last Updated: Jun 07 2018 3:43PMनगर : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या पुढाकारातून महापालिकेने सुरु केलेल्या सीना नदी पात्रातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे.

नदी पात्रात अतिक्रमण करुन बांधण्यात आलेल्या नंदनवन लॉनचे अतिक्रमण हटविण्यास पोलिस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. मनपातील एका माजी पदाधिकारी व नगरसेवकाशी संबंधित असलेल्या अतिक्रमणावर हातोडा मारण्यात आल्यामुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सीना नदीपात्रातील नंदनवन लॉनवरील कारवाईला न्यायालयातून स्थगिती आल्याचा जाधव परिवाराने दावा केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या पुढाकारातून महापालिकेने सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहिमे थांबविण्याची मागणी केली आहे.

याबाबत ऑर्डर हातात आली नसल्याने कारवाई सुरूच राहणार आहे. स्थगितीची ऑर्डर हातात आल्यावर निर्णय घेवू असे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणाची उद्या न्यायालयात सुनावणी असून तोपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिल्याचे सुरषा इथापे म्हणाले.