Sat, Feb 16, 2019 20:54होमपेज › Ahamadnagar › नगर-सोलापूर मार्गावर अपघात ३ जण जागीच ठार, १ गंभीर 

नगर-सोलापूर मार्गावर अपघात ३ जण जागीच ठार, १ गंभीर 

Published On: Dec 09 2017 11:28PM | Last Updated: Dec 09 2017 11:28PM

बुकमार्क करा

श्रीगोंदा- प्रतिनिधी 

नगर-सोलापूर मार्गावरील मांडवगण फाटयानजिक आज (९) रात्री सव्वा दहाच्या दरम्यान जीप आणि ट्रकमध्ये समोरासमोर धड़क होऊन जीपमधील तिघे जण जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मयत नगर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

धडक इतकी भीषण होती की, या अपघातात क्रिएटा या गाडीचा पूर्णतः चक्काचुर झाला आहे. अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.