Wed, Nov 21, 2018 23:33होमपेज › Ahamadnagar › जामखेड-नगर रोडवर साई भक्तांच्या गाडीला अपघात, एक ठार 

जामखेड-नगर रोडवर साई भक्तांच्या गाडीला अपघात, एक ठार 

Published On: Sep 04 2018 4:52PM | Last Updated: Sep 04 2018 4:52PMनगर : प्रतिनिधी

जामखेड-नगर रोडवर जामखेड पासून दहा की मी आंतरावरील पोखरी फटा येथे साई भक्तांच्या इनोव्हा गाडीला आज सकाळी आठ वाजता भीषण अपघात झाला. पुलावरून गाडी खाली गेल्याने हा अपघात झाला. या अपघातात आठ जण जखमी झाले असून एका माहिलेचा मृत्‍यू झाला आहे. निलावेनी श्रीरामडु नानचर्ला (वय, २५)  असे अपघातात ठार झालेल्‍या महिलेचे नाव आहे. 

जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, सर्व जखमींवर जामखेड येथील खाजगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.