Sun, Jan 20, 2019 00:10होमपेज › Ahamadnagar › नगर-सोलापूर मार्गावर अपघात, ५ ठार 

नगर-सोलापूर मार्गावर अपघात, ५ वारकरी ठार 

Published On: Jul 22 2018 8:33AM | Last Updated: Jul 22 2018 8:34AMकर्जत (जि. अहमदनगर): पुढारी ऑनलाईन

नगर-सोलापूर मार्गावर पाटेवाडी शिवारात आज (दि. २२) पहाटे ट्रक आणि जीपच्या अपघातात पाच जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. अपघातात ठार झालेले सर्व जण नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील असल्‍याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. 

दगडू आनंदा भणगे (वय, 50), बाळासाहेब लक्ष्मण माळवदे (वय 50), रमेश भाऊसाहेब कातोरे (वय 51),  द्रोपदाबाई भाऊसाहेब कातोरे (वय 70, सर्व रा. खरवंडी, ता नेवासा), हनुमान अंबादास दुसे (रा. खुराडी, ता. जामखेड)  अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. सत्यम रमेश कातोरे (वय 16, रा. खरवंडी, ता नेवासा) असे जखमीचे नाव असून त्‍याच्यावर जामखेड येथील रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.  

आषाढी वारीनिमित्‍त खरवंडी येथील वारकरी पंढरपूरला गेले होते. ते पंढरपूर येथून परत येत असताना नगर-सोलापूर रस्त्यावर कर्जत तालुक्यात त्‍याच्या स्‍कारपियो जीपला ट्रकने धडक दिली. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्‍यू झाला.