Sat, Jul 20, 2019 23:50होमपेज › Ahamadnagar › गैरहजर महापालिका कर्मचारी रडारवर!

गैरहजर महापालिका कर्मचारी रडारवर!

Published On: Jun 01 2018 1:44AM | Last Updated: May 31 2018 11:25PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या केडगाव उपकार्यालयात तसेच परिसरात विविध विभागांच्या कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांच्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतलेल्या बैठकीस असलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. 156 पैकी अनुपस्थित असलेले 24 कर्मचारी प्रशासनाच्या रडारवर असून रजेवर असलेले वगळता उर्वरीत सर्वांवर कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, उद्यान विभागाच्या नावाखाली पदाधिकार्‍यांच्या सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांची मात्र बदली टाळण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे.

बुधवारी (दि.30) जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या आढावा बैठकीस 156 पैकी 132 कर्मचारी उपस्थित होते. तब्बल 24 कर्मचार्‍यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली. यात आरोग्य विभागा17, पाणीपुरवठा विभागाचे 4,  उपकार्यालयातील 2 व इतर एक अशा 24 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. बैठकीची पूर्वसूचना दिलेली असतांनाही कर्मचारी गैरहजर होते. यातील जे परवानगी घेऊन रजेवर होते ते कर्मचारी वगळता उर्वरीत कर्मचार्‍यांवर कारवाई होणार आहे. दुसरीकडे उद्यान विभागातील कर्मचार्‍यांची संख्या कमी करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. 68 पैकी पहिल्या टप्प्यात 20 कर्मचार्‍यांच्या इतरत्र बदल्या होणार आहेत. या विभागातील अनेक कर्मचारी पदाधिकार्‍यांच्या सेवेत आहेत. काही स्वतःचे खासगी व्यवसाय करतात. एक कर्मचारी तर कित्येक वर्षांपासून तेलाचा दुकानात कार्यरत आहे. अशा कर्मचार्‍यांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध असून या कर्मचार्‍यांची प्राधान्याने इतर विभागात बदली केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.