Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Ahamadnagar › जीएसटी कपात; आ. जगतापांची लक्षवेधी!

जीएसटी कपात; आ. जगतापांची लक्षवेधी!

Published On: Mar 07 2018 12:55PM | Last Updated: Mar 07 2018 12:55PMनगर : प्रतिनिधी

जीएसटीपोटी महापालिकांना दरमहा दिल्या जाणाऱ्या अनुदानात मार्च महिन्यामध्ये ७.०९ कोटींची कपात करत शासनाने नगर महापालिकेला अवघे ३ लाख रुपये मंजूर केले आहेत. यामुळे मनपाची आर्थिक कोंडी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी विधीमंडळात लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारला जाब विचारला.

सरकारच्या या जीएसटी अनुदानावर मनपा कर्मचाऱ्यांचे पगार अवलंबून असतात. त्यात आर्थिक वर्षाखेरीस जवळपास संपूर्ण अनुदान कपात झाल्यामुळे २००० कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दुसरीकडे महावितरणचे संकट आणि ठप्प असलेली वसुली यामुळे आर्थिक कोंडी निर्माण होणार असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी सरकारने हस्तक्षेप करून मनपाची झालेली आर्थिक कोंडी फोडावी, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी केली आहे.