Sun, Nov 17, 2019 07:20होमपेज › Ahamadnagar › तरुणावर बिबट्याचा हल्ला

तरुणावर बिबट्याचा हल्ला

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 12:01AMसंगमनेर : प्रतिनिधी

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी  झालेल्या  तालुक्यातील सांगवी येथील शालेय विद्यार्थ्यांवर शहरातील डॉ. कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

संगमनेर तालुक्यातील सांगवी येथील तरुण तेजस साहेबराव कातोरे (वय 17) व शेखर कातोरे हे दोघे   मोटरसायकलचे काम करण्यासाठी निमगावपागा या ठिकाणी गेले. काम आटोपल्यावर पुन्हा घरी जात असताना निमगाव व सांगवीच्या शिवारात रस्ता पार करत असताना हे दोघाची  मोटारसायकल बिबट्याच्या जवळून गेली असता अचानक बिबट्याने मोटरसायकलवर झेप घेऊन मागे बसलेल्या तेजस साहेबराव कातोरे या विद्यार्थ्यावर जोराचा पंजा मारत त्याच्या पायाला चवा घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु मोटरसायकल जोरात असल्याने तेजसच्या पायाला बिबट्याचे दात ओरखडल्याने पायाला चांगल्याच जखमा झाल्या. त्यामुळे त्यास तत्काळ प्राथमिक उपचार करण्यासाठी निमगावपागा येथे डॉ. कानवडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर रक्तस्राव जास्त होत असल्यामुळे   त्यास तात्काळ संगमनेर येथिल कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.

घटनेची खबर मिळतात वनविभागाचे शेखर पाटोळे, व पवार हे तेजस कातोरे उपचार घेत असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखला होऊन सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले.
संगवी व निमगाव परिसरात पुनः बिबट्याच्या दहशतने घबराटीचे वातावरण झाले असून, वनविभागने तातडीने या भागात पिंजरा लावण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.