Tue, Nov 20, 2018 17:51होमपेज › Ahamadnagar › ‘आधी लगीन वॉटरकपचं,मग आमचं...’

‘आधी लगीन वॉटरकपचं,मग आमचं...’

Published On: Apr 19 2018 1:28PM | Last Updated: Apr 19 2018 1:33PMकर्जत : प्रतिनिधी

‘आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं’ असं म्हणत चारशे वर्षांपूर्वी तानाजी मालुसरे यांनी स्वराज्याप्रती आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले होते. आता एका पदवीधर तरुण तरुणीने सामाजिक चळवळीच्या माध्यातून सुरु असलेले काम पूर्ण झाल्यानंतर लग्न केले आहे. 

कर्जत येथील खंडेशरी गावात स्थापलिंग डोंगरावर पाणी फाऊंडेशनचे काम केले जात आहे. यात मोठ्या प्रमाणावर तरुणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सोलापूरच्या नाना वाघमारे आणि शितल पुजारी यांनीही श्रमदान केले. त्यानंतर त्यांनी विवाह केला. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा सर्वत्र होत आहे. 

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पाणी फाऊंडेशनच्या चळवळीतून राज्यात अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. कर्जत येथे टाकळी खंडेश्वरी गावतदेखील हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमावेळी पदवीधर युवक युवतीने श्रमदानानंतर विवाह केला. या विवाह सोहळ्याला राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे उपस्थित होते.

Tags : Water Cup, Pani Foundation, Youth, marriage,