Mon, Apr 22, 2019 03:47होमपेज › Ahamadnagar › महिलांचा नगरपंचायतीसमोर ठिय्या

महिलांचा नगरपंचायतीसमोर ठिय्या

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 10:28PMनेवासा : प्रतिनिधी

नेवासा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा परिसरातील असलेल्या सावतानगर येथे पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी काल (दि.15) या भागातील महिलांनी अचानक नगरपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले. या परिसरातील पाईपलाईन होईपर्यंत टँकरद्वारे तात्पुरती पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्‍वासन चर्चेनंतर मुख्याधिकारी समीर शेख यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी सुरेखा टेमक म्हणाल्या, आमचा परिसर नेवासा नगरपंचायत हद्दीत येतो. या भागातून इतर ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन जोडलेली आहे. मात्र या पाईपलाईनद्वारे आम्हाला नळजोडणी न दिल्याने या भागातील रहिवाशांना बोअरवेलच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मात्र बोअरचे पाणही अटल्याने सध्या या परिसरात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या भागासाठी स्वतंत्र पाईपलाईन देऊन पिण्याच्या पाण्याची कायमची व्यवस्था करण्यात यावी.

यावेळी आंदोलनकर्त्या महिला, मुख्याधिकारी शेख व नगरसेवकांच्या झालेल्या चर्चेत आठ दिवसांत नवीन पाईपलाईन जोडण्याचे व तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मुख्याधिकार्‍यांनी दिले. आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.    यावेळी विजया गोलवड, निकिता रासकर, अलका कुरुंद, पुष्पा कळमकर, सीमा आहेर, मंगल क्षीरसागर, यमुना घोडेचोर, शारदा मगर, मालिनी बिरांजे, उषा साळवे, उषा म्हसे, ननाबाई बनकर यांच्यासह परिसातील महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.