Fri, Feb 22, 2019 21:48होमपेज › Ahamadnagar › अधिकार्‍यांना दिले मोकळे हंडे!

अधिकार्‍यांना दिले मोकळे हंडे!

Published On: Feb 09 2018 1:58AM | Last Updated: Feb 08 2018 10:52PMनगर : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने प्रभाग क्र.7 मधील महिलांनी काल (दि.8) नगरसेविका मनिषा काळे-बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली महापौर सुरेखा कदम व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख महादेव काकडे यांना भेटून गार्‍हाणे मांडल. पाणीप्रश्‍नाच्या निषेधार्थ त्यांना मोकळे हंडे दिले.

नगरसेविका बारस्कर म्हणाल्या की, प्रभाग क्र. 7 मधील रावसाहेब पटवर्धन स्मारकामागील भाग्योदय गृहनिर्माण सोसायटी व परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन 40 वर्षांपूर्वी टाकण्यात आली होती. अवजड वाहने जाऊन ही पाण्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. ही समस्या तातडीने सोडविण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे. यावेळी महापौर सुरेखा कदम यांनी पाणीपुरवठा विभागप्रमुख महादेव काकडे यांना बोलावून पाणीप्रश्‍न तातडीने सोडविण्याबाबत चर्चा करुन तसे आदेश दिले. पाणीप्रश्‍न लवकरात लवकर सुटण्यासाठी सोमवारी (दि.12)स्वत: अधिकार्‍यांसमवेत पाहणी करणार असल्याचे महापौर कदम यांनी सांगितले. याप्रसंगी उर्मिला काकड, हेमंत पतकी, माधुरी क्षीरसागर, माणिक कोटस्थाने, कुसूम मंत्री आदींसह महिला व नागरिक उपस्थित होते.