Wed, Jul 24, 2019 14:41होमपेज › Ahamadnagar › महिलेच्या प्रसंगावधानाने बिबट्या पडला विहिरीत

महिलेच्या प्रसंगावधानाने बिबट्या पडला विहिरीत

Published On: May 05 2018 12:47AM | Last Updated: May 04 2018 11:42PMशेवगाव : प्रतिनिधी

ऊसतोड महिलेला भक्ष्य करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना मुंगी येथे घडली. तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नाने वन विभागाने बिबट्याला विहिरीबाहेर काढून पिजंर्‍यात जेरबंद केले.

तालुक्यातील नविन खामपिंप्री शिवीरात काल (दि. 4) स. 11 वाजण्याच्या सुमारास आत्माराम पावसे यांच्या शेतात ऊसतोड चालू होती. या उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मंगल पवार या ऊसतोड कामगार महिलेला भक्ष करण्यासाठी झेप घेतली. मात्र, प्रसंगावधान राखत त्या लगेच खाली वाकल्याने हा बिबट्या जवळच असणार्‍या विहिरीत पडला. या प्रकाराने सर्व कामगार विहिरीच्या काठावर जमा झाले. संपूर्ण परिसरात हे वृत्त पसरल्याने बघ्याची मोठी गर्दी झाली होती.

याची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वनपाल एम.बी. राठोड, छबू रोडे, वनरक्षक एस.आर. बुधवंत, राहुल तरोडे, पांडूरंग हंडाळ, बबन मंचरे, एस.आर. देवकर, सविता दहिफळे, सविता शिरसाठ, एम. बी. ससे या पथकाने सांयकाळी 7 वा. बिबट्याला वर काढून पिंजर्‍यात जेरबंद केले.