Mon, Sep 24, 2018 05:11



होमपेज › Ahamadnagar › नागरदेवळे येथील ग्रामसभेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर : ग्रामसभेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: May 25 2018 12:58PM | Last Updated: May 25 2018 12:58PM



अहमदनगर : प्रतिनिधी

घराच्या उताऱ्यावरून नोंद कमी केल्याने महिलेने ग्रामसभेत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील नागरदेवळे येथे ही घटना घडली. महिलेला उपचारासाठी नगरच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छाया बाबासाहेब जरे असे आत्‍महत्येचा प्रयत्‍न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छाया आणि तिच्या नवऱ्याच्या नावावर राहत्या घराची नोंद होती. परंतु, मागील महिन्यात पती, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने आर्थिक व्यवहार करून छाया हिचे नाव घराच्या नोंदीतून कमी केल्याची तक्रार छायाने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, त्‍यांच्या तक्रारीची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे चिडलेल्या छाया यांनी ग्रामसभा सुरू असताना आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच ग्रामसेवकाच्या अंगावर शाई फेकत विष प्राशन केले. महिला पोलिस नसल्याने अडविण्याचा प्रयत्न झाला नाही. घटनेनंतर छाया यांच्यावर उपचार सुरू आहेत.