Wed, Feb 20, 2019 00:25होमपेज › Ahamadnagar › आजारपणास कंटाळून वृद्धेने पेटवून घेतले 

आजारपणास कंटाळून वृद्धेने पेटवून घेतले 

Published On: Dec 13 2017 1:28PM | Last Updated: Dec 13 2017 1:28PM

बुकमार्क करा


नगर : प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील माका येथील ७५ वर्षीय वृद्धेने आजरपणाला कंटाळून पहाटेच्या सुमारास रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. वैजंताबाई दशरथ कोकाटे (वय ७५, रा. कोकाटे वस्ती, माका शिवार) असे वृद्ध महिलेचे नाव आहे. 
गेल्या ४-५ वर्षांपासून त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. अंगाला सतत खाज सुटत होती, बुधवारी पहाटे त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले त्यात मृत्यू झाला. सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 
वैजयंता कोकाटे यांना तीन विवाहित मुले आहेत, त्यापैकी एक रायगड जिल्ह्यात शिक्षक आहे. माक्यात दुसऱ्या मुलांसोबत त्या राहत होत्या. हा मुलगा शेती करतो. कोकाटे रोज घरा समोरच्या ओट्यावर झोपायच्या. सकाळी त्या दिसल्या नाही म्हणून सुनेने पाहिले. शोधाशोध केली असता जवळच जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह दिसला.