Wed, Mar 27, 2019 05:57होमपेज › Ahamadnagar › मनपा बरखास्त का करू नये?

मनपा बरखास्त का करू नये?

Published On: Apr 13 2018 1:12AM | Last Updated: Apr 12 2018 11:22PMनगर : प्रतिनिधी

शहर व महापालिकेच्या कारभाराची गंभीर अवस्था झालेली असल्यामुळे महापालिका बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्‍ती का करु नये? असा जाब औरंगाबाद खंडपिठाने विचारला आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारसह महापौर, आयुक्‍त व पोलिस अधीक्षकांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसाही बजावण्यात आल्याचे याचिकाकर्ते सुहास मुळे यांनी सांगितले.

सुहास मुळे यांनी महापालिकेतील भोंगळ कारभार, घोटाळे, सुविधांचा उडालेला बोजवारा या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन प्रशासक नियुक्‍तीची मागणी केली आहे. काल (दि.12) न्या. एस. एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपिठापुढे सुनावणी पार पडली. यात स्वतः मुळे यांनी याबाबत बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने याचिका दाखल करुन घेतली आहे. महापालिका व शहराची एवढी गंभीर अवस्था झाली असल्यास पालिका बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्‍ती का करु नये? असा जाब विचारत खंडपिठाने केंद्र व राज्य सरकारसह महापौर, आयुक्‍त व पोलिस अधीक्षकांना नोटीसा बजावल्या आहेत. 24 एप्रिलपर्यंत याबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले असल्याचे याचिकाकर्ते मुळे यांनी सांगितले.

Tags : Ahmadnagar, sack, Municipal Corporation