होमपेज › Ahamadnagar › पाणीयोजनेला मंजुरी; मुख्यमंत्र्यांचा सत्कार

पाणीयोजनेला मंजुरी; मुख्यमंत्र्यांचा सत्कार

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 11:05PMकोपरगाव : प्रतिनिधी

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने 260 कोटी रुपये खर्चाच्या निळवंडे कोपरगाव पाणीयोजनेला प्रशासकीय मंजुरी दिल्याबद्दल कोपरगाव नगरपालिका भाजपा-शिवसेना, रिपाइंच्या नगरसेवकांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी मुंबई मंत्रालयात सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने कोपरगाव मुख्यालयासह जिल्हा व्हावा, या मागणीचे निवेदनही फडणवीस यांना सादर केले.

याप्रसंगी भाजपा गटनेते माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक, अमृत संजीवनीचे उपाध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,  शिवसेनेचे कैलास जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, वैभव आढाव, बबलू वाणी  उपस्थित होते.

आ. कोल्हे यांनी शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यासाठी साईबाबा शताब्दी सोहळयानिमित्त शिर्डी निळवंडे पिण्याचे पाणीयोजना मंजूर झाली होती. त्यात कोपरगाव नगरपालिकेचा समावेश करून ती शिर्डी ते कोपरगाव अशी जोडण्यात यावी, म्हणून साडेतीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. त्यास सरकारने मंजुरी दिली. त्याबद्दल कोपरगाव नगरपालिकेचे गटनेते रविंद्र पाठक यांच्यासह अन्य नगरसेवक यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.