Tue, Mar 19, 2019 11:22होमपेज › Ahamadnagar › मोबाईल व्हॅनद्वारे पाणी 

मोबाईल व्हॅनद्वारे पाणी 

Published On: Apr 21 2018 12:58AM | Last Updated: Apr 21 2018 12:17AMसंगमनेर शहर : प्रतिनिधी

स्वच्छ शहर म्हणून देशात आठवा क्रमांकाने संगमनेरचा उल्लेख झाला. आता स्वच्छ आरोचे थंड पाणी पुरवणारी संगमनेर नगरपालिकाही देशात एकमेव असेल असे म्हटले तरी वावगे ठरू नये. पालिकेने आता शहरात मोबाईल व्हॅनद्वारे पाणी पुरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. केवळ 10 रुपयामध्ये 20 लिटर पाणी व 1 रुपयाला 1 लिटर असे दर ठरवण्यात आले आहे. 

‘जीवनधारा’ नाव असणारी ही अत्याधुनिक व्हॅन अतिशय सुंदर पद्धतीने सजवली आहे. त्याचे एटीएम कार्डही 200 रुपयांमध्ये देण्यात येते. कार्ड मशिनमध्ये टाकल्यानंतर बटन दाबून आपल्याला हवे तेवढे पाणी जार अथवा बाटलीमध्ये घेता येते. कार्ड जाग्यावर रिचार्ज करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ.डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांचे सहकारी नगरसेवक अधिकारी, कर्मचारी हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे. शहरात काही गर्दीच्या ठिकाणी या जीवनधारा व्हॅन कायमस्वरूपी ठेवण्यात आल्या आहेत. शहरात सर्व भागात फिरत्या व्हॅन आहेत.  तालुक्यातून शहरात येणार्‍या लोकांचीही या योजनेतून तहान भागत आहे.  दरम्यान, राज्यातील अन्य पालिकांसमोर संगमनेरने मोबाईल वॉटर व्हॅनचा एक आदर्श उभा केला आहे.

Tags : Ahmadnagar, Water, mobile, van