Sun, May 31, 2020 19:17होमपेज › Ahamadnagar › वारकर्‍यांची आरोग्य तपासणी

वारकर्‍यांची आरोग्य तपासणी

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 18 2018 11:58PMनान्नज : वार्ताहर

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणार्‍या 108 रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या पथकाने श्री संत सखाराम महाराज संस्थानच्या दिंडीतील वारकर्‍यांची आरोग्य तपासणी केली.

संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर (जि. जळगाव) ते पढंरपुर या दिंडीतील भाविकींचे प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्यासह नान्नजनगरीत आगमन झाले. या दिंडीचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले.  त्यांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था किंबहुणे कुटुंबाने गेली. 

नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणार्‍या 108 रुग्णवाहिकेने  वारकर्‍यांची आरोग्य तपासणी केली. या शिबिराचे उद्घाटन प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  108 रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप काळे, डॉ. जान्हवी काळे यांनी अमळनेरकर यांच्यासह 211  वारकर्‍यांची मोफत आरोग्य तपासणी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर पवार, पायलट भरत काटे, संजय ओहळकर, पाणी फाउंडेशनचे नितीन मोहळकर, डॉ. सर्जेराव मोहळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार कोळपकर,  संतोष चोरडिया, संजय दोशी, किरण पवार, पालवे, पोपट क्षीरसागर, विठ्ठल कोळपकर, अमोल पंडित, आनंद किंबहुणे, अ‍ॅड. अरुण किंबहुणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.