Thu, Aug 22, 2019 12:28होमपेज › Ahamadnagar › वडार समाजाचा कचेरीवर मोर्चा

वडार समाजाचा कचेरीवर मोर्चा

Published On: Jan 30 2018 11:15PM | Last Updated: Jan 30 2018 11:10PMनगर : प्रतिनिधी

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी येथे वडार समाजातील अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेला महिना झाला तरी यातील आरोपींना अटक करण्यात न आल्याने वडार संघर्ष समितीच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

माळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा दुपारी जिल्हाधिकरी कार्यालयावर धडकला. याठिकाणी निषेध सभा घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भरत  विटकर, राकेश विटकर, मुकुंद पोवार, रमेश जेठे, संदीप कुसळकर आदी प्रमुख उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, 28 डिसेंबर रोजी अत्याचार करून ह्या अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. यातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. पोलिस आरोपींना अटक करण्यात हलगर्जीपणा करत आहेत. या घटनेत धनदांडग्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मारेकर्‍यांना पाठीशी घालणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करावे, हत्याकांडातील आरोपी व आईची नार्को टेस्ट करण्यात यावी, हत्याकांडाची सीबीआय चौकशी करावी, हत्यार्‍यांना पाठीशी घालणार्‍या पुढार्‍यांना गुन्ह्यात आरोपी करावे, फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल त्वरित घ्यावा, हा खटला जलदगती न्यायालयात चालावा तसेच मारेकर्‍यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.