Sat, Mar 23, 2019 16:20होमपेज › Ahamadnagar › डिजिटल युगात वासुदेवाला भोगाव्या लागताहेत यातना!

डिजिटल युगात वासुदेवाला भोगाव्या लागताहेत यातना!

Published On: Jul 08 2018 1:42AM | Last Updated: Jul 07 2018 11:21PMखेड : वार्ताहर 

आपल्या मधुर वाणीने साखर झोपेतील गावाला उठवणारा वासुदेव आता डिजिटल युगात लुप्त होत आहे. अभंगाने लोकांची मने रिजविणार्‍या वासुदेवाची स्वारी हल्ली खेड्यांमध्ये येईनाशी झाली आहे. जनजागृती करणारे वासुदेव जनमाणसांत संस्कृती रुजवत आहेत. मात्र डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात असणार्‍या स्मार्ट फोनबरोबर स्पर्धा करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. मोबाईलमुळे अभंग, ओव्या, भारुडे ऐकण्याची तरुणाईची मनःस्थिती नसल्याचे दिसते. 

पूर्वी साखर झोपेतच वासुदेव गावात येत. मात्र आता उगाच सकाळी लवकर साहेबांना झोपेतून उठवून मिळणार्‍या दानालाही मुकावे लागेल! असा विचार करत वासुदेवांनीही स्वतःत बदल करून घेतला आहे. खेड येथे आलेले वासुदेव शंकर दत्तात्रय यादव (रा. आढेगाव, ता. माढा) यांनी पूर्वी आणि आताची परिस्थिती कथन केली. पूर्वी वासुदेव गावात आला, तर त्याला प्रेमाने दान दिले जायचे. सध्या अशी परिस्थिती नाही. राईनपाडा घटनेमुळे वासुदेवांचा उदरनिर्वाहही कठीण झाला आहे. माणूसच राक्षस झाला, तर लोककला, संस्कृतीला कुठे स्थान मिळणार? शिवरायांनी देखील वासुदेवांकडून मावळ्यांना निरोप पाठविले आहेत. वासुदेवाची लोककलेला जनमाणसात टिकवून ठेवण्याची गरज आहे.

आजचा लोककला काय जोपासणार?  

भरकटत चाललेला समाज, सोशल मीडियाच्या आहारी गेलेली पिढी, यामुळे आम्हाला खेड्या-पाड्यात येणेही धोक्याचे वाटते. उगाच संशय घेऊन कुणी जीव घेतला, तर पोराबाळांचे काय? अशी खंत यादव यांनी ‘पुढारी’कडे व्यक्त केली.