Sat, Feb 23, 2019 16:56होमपेज › Ahamadnagar › स्व. वाजपेयी यांच्या आठवणींना कर्जतमध्ये उजाळा

स्व. वाजपेयी यांच्या आठवणींना कर्जतमध्ये उजाळा

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 10:40PMकर्जत : प्रतिनिधी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच कर्जत तालुक्यामध्ये शोककळा पसरली. अनेकांनी स्व. वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. वाजपेयी यांच्या निधानचे वृत्त समजताच अनेकांना त्यांच्या आठवणींमुळे भावना अनावर झाल्या होत्या. एक सच्चा देशभक्त व सच्चा राजकारणी असलेला नेता गेल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिली. काही जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सोबत काढलेली स्वत:ची छायाचित्रे आणि इतर आठवणी सांगितल्या. सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. येथील व्यापारी बबन महाजन व नामदेव काकडे यांनी नवी दिल्ली येथे 1985 साली स्व. वाजपेयी यांची भेट घेतल्याची आठवण सांगितली.वाजपेयी यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीचीच चर्चा तालुक्यात सर्वत्र होती.