Fri, Jul 19, 2019 17:46होमपेज › Ahamadnagar › नगर : जमिनीच्या वाटणीवरून चिमुकल्याचा खून

नगर : जमिनीच्या वाटणीवरून चिमुकल्याचा खून

Published On: Feb 09 2018 11:38AM | Last Updated: Feb 09 2018 11:39AMनगर : प्रतिनिधी

भिंगान येथील बाल्या ऊर्फ वैभव बापू  पारखे (वय १ वर्षे ६ महीने) या चिमुकल्याच्या खुनाचा छडा लावण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वाटणीवरून हा खून केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, १३ नोव्हेबर २०१७ ला वैभव पारखे या बालकाचे दुपारच्या सुमारास अपहरण झाले होते. त्यानंतर तेरा दिवसांनी घराच्या बाजुलाच त्याचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी पोलिस तपास करत असताना हा खुन   वैभव याचा मोठा भाऊ लालासाहेब बापू पारखे (वय २७) व पत्नी काजल लालासाहेब  पारखे ( वय २१ वर्षे ) या दोघानी केला असल्याचे समोर आले.  सासू  संगीता अंकुश वरपे (वय ४९)  हिच्या  सांगण्यावरून वैभवचा दगडाने  ठेचुन  खून  केल्या चे  निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात  घेतले  आहे. दरम्यान हा खून जमिनीच्या वाटणीवरून  केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव हे अधिक तपास करत आहेत.