Sun, Aug 25, 2019 04:47होमपेज › Ahamadnagar › शेतीसाठी नवे तंत्रज्ञान वापरा

शेतीसाठी नवे तंत्रज्ञान वापरा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

कृषी क्षेत्रातील बदलत्या परीस्थितीत शेतकर्‍यांना उत्पादन वाढीसाठी  प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा प्रकारचे महोत्सव उपयुक्त ठरतील. शेतकर्‍यांनीही नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

तांबटकर मळा येथील मैदानावर जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने आयोजित कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. दिलीप गांधी होते. महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी कीर्ति जमदाडे-कोकाटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी, युवराज शेळके आदी यावेळी उपस्थित होती.

शिंदे म्हणाले, शेतकर्‍यांसाठी  शासनामार्फत  राबविण्यात येणार्‍या विविध कृषी विषयक  योजना, उपक्रमांची माहिती अद्यायावत कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकर्‍यांचे अनुभव कृषी पुरक व्यवसाय, बाजार व्यवस्थापन  इत्यादी मार्गदर्शन या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय, शेतकरी गट आणि शेतकर्‍यांमार्फत शेतातील धान्य थेटपणे ग्राहकांना मिळावे, यासाठी विक्री करण्यात येत आहे. ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही याचा फायदा आहे. राज्य शासनाने अशा प्रकारे शेतकर्‍यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे.

जिल्ह्याने जलयुक्त शिवार अभियान अतिशय चांगल्या प्रकारे राबविले. जिल्हा प्रशासन आणि लोकसहभागातून ते यशस्वी झाले. त्याची पोचपावती म्हणजे मार्च महिन्यातही शिवारात पाणी दिसत असून, टँकरची मागणी एकाही गावातून नाही. हे सारे यश शेतकर्‍यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. सेंद्रीय शेतीचे महत्व आता वाढू लागले आहे. कारण, वाढत्या प्रमाणातील कीटकनाशके आणि रासायनिक खतांमुळे विविध आजारांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीमालाची वाढती गरज ओळखून उत्पादन घ्यावे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बर्‍हाटे यांनी कृषी महोत्सव आयोजनामागील भूमिका मांडली. यावेळी विविध शेतकरी गट आणि उत्कृष्ट शेतकर्‍यांना सन्मानित करण्यात आले.

 

Tags : Ahmednagar,  Ahmednagar news, farmer, technology, 


  •