Wed, Mar 27, 2019 06:34होमपेज › Ahamadnagar › उरण जेएनपीटी बंदरात कोट्यवधीचे सोने जप्त

उरण जेएनपीटी बंदरात कोट्यवधीचे सोने जप्त

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 11:45PM

बुकमार्क करा
उरण ः प्रतिनिधी

जेएनपीटी बंदरातून आलेल्या तस्करीच्या सोन्यावर डीआरआयने (महसूल गुप्तचर संचालनालयाने) धाड टाकून केलेल्या कारवाईत परदेशातून एसी बॉक्समधून आणलेले कोट्यवधीचे तस्करीचे सोने जप्त केले आहे.  यातील सुमारे 100 बॉक्समधील 50 टक्के बॉक्समध्ये सोने असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकाराने उरणचे जेएनपीटी बंदर तस्करासाठीचा मोठा अड्डा उघड होण्याची शक्यता आहे. यापूर्वी चंदन तस्करीमुळे गाजलेल्या जेएनपीटीला आता सोन्याच्या तस्करीचाही बट्टा लागला आहे. नवघर गावाजवळील जेडीएल नावाच्या गोदामात गुप्तचरांच्या माहितीनुसार टाकलेल्या धाडीनंतर हा प्रकार उघड झाला.