Fri, Nov 16, 2018 21:38



होमपेज › Ahamadnagar › नगर : अनैसर्गिक अत्याचार करून लूट

नगर : अनैसर्गिक अत्याचार करून लूट

Published On: Apr 29 2018 11:53PM | Last Updated: Apr 29 2018 11:36PM



नगर : प्रतिनिधी

अनैसर्गिक अत्याचार करून साडेदहा लाख रुपयांची लूट केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. नागापूर शिवारातील इंडियन ऑईलच्या पाठीमागे निर्जनस्थळी 21 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेबाबत शनिवारी (दि. 28) सायंकाळी गुन्हा दाखल करून अटकेची कार्यवाही करण्यात आली.

अटक केलेल्यांमध्ये मोहसीन सय्यद, जुबेर सय्यद (दोघे रा. मुकुंदनगर, नगर) यांचा समावेश आहे. दोघांनाही 2 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. समद सय्यद, शाहनजीर कुरेशी, वसील टकला, समीर कुरेशी, शाहरूख (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. नागपूर चाळ, येरवडा, पुणे), हमीद (पूर्ण नाव माहीत नाही), बिंद्री व त्याचे दोन साथीदार, नवनाथ (पूर्ण नाव माहीत नाही, रा. लोणी फाटा, पुणे) हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, उत्तरप्रदेशातील एक जण 19 एप्रिल रोजी पंजाब येथून 112 बकरे मालमोटारीत भरून कराडला निघाला होता. मालमोटारीसोबत नवनाथ पहिलवान होता. तो डॉ. मोहसीन सय्यद व शाहनजीर कुरेशी यांच्या संपर्कात होता. 21 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता मालमोटार नगरला आली. एमआयडीसी भागातील इंडियन ऑईल पेट्रोलपंपाच्या मागे निर्जनस्थळी ट्रक नेण्यात आली. तेथे शेळ्या आरामासाठी उतरविल्या. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता डॉ. मोहसीन सय्यद व इतर 11 जणांचे टोळके तेथे आले. त्याीं लाकडी बॅट, काठी, चाबकाने बेदम मारहाण करून गुदद्वारात काठी घालून अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर 10 लाख 50 हजार रुपयांच्या बकर्‍या चोरून नेल्या. या घटनेबाबत शनिवारी सायंकाळी सदर व्यक्तीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांना अटक केली. अटक केलेल्या दोघांनाही रविवारी (दि. 29) सकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. गुन्ह्याचा सखोल तपास करणे, फरार आरोपींना अटक करणे आदींसाठी दोनही आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना 2 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.