Tue, Jul 23, 2019 12:41होमपेज › Ahamadnagar › आता मला बरे वाटत आहे : नितीन गडकरी 

आता मला बरे वाटत आहे : नितीन गडकरी 

Published On: Dec 07 2018 7:01PM | Last Updated: Dec 08 2018 1:19AM
राहुरी : प्रतिनिधी 

महात्‍मा फुले कृषी विद्‍यापीठाच्या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ आली होती. त्‍यानंतर त्‍यांना उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते. तपासणीनंतर डॉक्‍टरांनी त्‍यांची प्रकृती बरी असल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यानंतर, स्‍वत: गडकरी यांनी एका वृत्तसंस्‍थेशी बोलताना आपली प्रकृती ठिकठाक असल्‍याचे म्‍हटले आहे. 

'श्‍वास घेण्यास त्रास झाला आणि मला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर शुगर आणि रक्तदाब तपासणी करण्यात आली. आता मला बरे वाटत असून काळजी करण्याचे कारण नाही,'' असे गडकरी यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती स्थिर 

महात्‍मा फुले कृषी विद्‍यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्‍ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरींना भोवळ आल्‍याने ते स्‍टेजवर कोसळले होते. त्‍यामुळे उपस्‍थितांचा एकच गोंधळ उडाला होता. यावेळी पदवीदान समारंभात व्‍यासपीठावर राज्‍यपाल सी. विद्‍यासागर राव, पालकमंत्री राम शिंदे, कुलगुरु डॉ. के. पी. विश्‍वनाथा उपस्‍थित होते.