होमपेज › Ahamadnagar › जमिनीसाठी केंद्रीय मंत्री गडकरींना साकडे

जमिनीसाठी केंद्रीय मंत्री गडकरींना साकडे

Published On: Jun 18 2018 1:08AM | Last Updated: Jun 18 2018 12:30AMनगर : प्रतिनिधी

देशातील अनेक कुटुंबीयांना स्वतःचे घर नाही. घरकुल वंचितांना घरे मिळण्यासाठी साडेतीन वर्षांपूर्वी पंतप्रधान आवास योजना जाही केली. सर्वांची घरे होण्याकरिता ‘हायब्रीड लॅण्ड पुलिंग’ योजना राबविण्याची मागणी ‘मेरे देश मे मेरा अपना घर’ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच गडकरी यांची नागपूरला जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक वाकचौरे, डॉ. अभय बंगालकर, अशोक सब्बन आदींचा समावेश होता. घरकुल वंचितांचा प्रश्‍न मांडला. शहरा जवळील व ग्रामीण भागातील पडीक, खडकाळ व शेतकर्‍यांसाठी निकामी असलेली जमीन या योजनेच्या माध्यमातून घेऊन घरकुल वंचितांसाठी घरे उभारून जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना परतावा म्हणून विकसित जमिनीचा काही भाग परत देण्याच्या तरतूदीचा फॉर्म्युलाकडे गडकरी यांचे लक्ष वेधण्यात आले.